करमाळ्याची कमला देवी
श्री कमला देवीच्या मंदिरामुळे करमाळा शहर प्रसिध्द झाले आहे. ह्या मंदिरात ९६ ह्या संख्येला विशेष महत्व आहे. श्री राव राजे निंबाळकर यांनी १७२७ मध्ये श्री कमला भवानीचे मंदिर बांधले. करमाळ्याच्या कमला देवीच्या मंदिराला तुळजापूरच्या तुळजा भवानीचे दुसरे पीठ असे संबोधले जाते. हेमाड पंथी शैलीत बांधलेल्या ह्या मंदिराला दक्षिणपूर्व व उत्तर दिशेला प्रवेश द्वार आहेत. ह्या मंदिराची विशेषता म्हणजे मंदिरासमोर असलेल्या विहिरीला ९६ पायऱ्या आहेत. मंदिरात ९६ ओवऱ्या आहेत. मंदिरातील छतावर ९६ चित्र रेखाटले आहेत. मंदिरात एकूण ९६ खांब आहेत. देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. वार्षिक यात्रा कार्तिक पौर्णिमा ते चतुर्थी च्या काळात साजरा केला जातो
संपर्क तपशील
पत्ता: करमाळा
 
                                    कसे पोहोचाल?
विमानाने
जवळचे विमानतळ - पुणे.
रेल्वेने
जवळचे रेल्वे स्थानक जेऊर. मध्य रेल्वेच्या पुणे-सोलापूर मार्गावर आहे. जेऊरपासुन करमाळा 11 कि.मी.
रस्त्याने
सोलापूरपासुनचे अंतर 135 कि.मी. पुण्यापासुन 200 कि.मी. अहमदनगरपासुन 90 कि.मी.
 
         
        