बंद

    जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम (JSSK)

    तारीख : 01/01/2023 - क्षेत्र: Health

    या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश सरकारी आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या गरोदर महिला आणि आजारी नवजात बालकांचा खर्च शून्य (Zero Out-of-Pocket Expenditure) करणे हा आहे. कोणतीही गरोदर महिला पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये, हा याचा हेतू आहे.

    लाभार्थी:

    सरकारी आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या गरोदर महिला आणि आजारी नवजात बालकांचा खर्च शून्य करणे हा आहे

    फायदे:

    अ) गरोदर महिलांसाठी: 1.मोफत प्रसूती: नैसर्गिक आणि सिझेरियन (C-section) दोन्ही शस्त्रक्रिया मोफत. 2.मोफत औषधे: उपचारासाठी लागणारी सर्व औषधे आणि साहित्य मोफत. 3.मोफत तपासणी: रक्त, लघवी आणि अल्ट्रासाऊंड (Sonography) चाचण्या मोफत. 4.मोफत आहार: प्रसूतीनंतर रुग्णालयात असेपर्यंत मोफत जेवण (३ ते ७ दिवस). 5.मोफत रक्त: गरज पडल्यास रक्ताची व्यवस्था मोफत. 6.मोफत वाहतूक: घरातून रुग्णालयात येण्यासाठी, एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात जाण्यासाठी आणि डिस्चार्जनंतर घरी परतण्यासाठी मोफत रुग्णवाहिका (१०२/१०८). आजारी बालकांसाठी (१ वर्षापर्यंत): 1.सर्व प्रकारचे औषधोपचार आणि शस्त्रक्रिया मोफत. 2.सर्व आवश्यक निदान चाचण्या मोफत. 3.गरज पडल्यास मोफत रक्त पुरवठा. 4.मोफत रुग्णवाहिका सेवा.

    अर्ज कसा करावा

    सरकारी आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीसाठी येणाऱ्या गरोदर महिला आणि आजारी नवजात बालकांचा खर्च शून्य करणे हा आहे