सोलापूर 📍 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जिल्हा परिषदेच्या वसतीगृहाची केली तपासणी.
सोलापूर जिल्हा परिषदेचे सोलापूर शहरात दोन वसतीगृहे आहेत. शेळगी येथे मुलींसाठी तर पार्क चौकात मुलांसाठी नेहरू वसतीगृह आहे. या दोन्ही वसतीगृहांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आज रविवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जैन यांनी वसतीगृहात उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या. यावेळी उपस्थित वसतीगृह अधिक्षक यांना वसतीगृहातील सुविधांबाबत सूचना केल्या.