बंद

    राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना

    तारीख : 01/01/2025 - 31/12/2026

    “राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना” अंतर्गत महाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्र. वृकमा ४३२१ (१५)/प्र.क्र.१४५/सां.का. ४ पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, दिनांकः १६ मार्च, २०२४ नूसार कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार यांना प्रती महीना रुपये ५०००/- मानधन देण्यात येते.

    लाभार्थी:

    कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार यांना प्रती महीना रुपये ५०००/- मानधन देण्यात येते.

    फायदे:

    वृध्द कलाकारांना त्यांच्या आवश्यक खर्च भागविण्यासाठी या योजनेमुळे दिलासा मिळाला आहे

    अर्ज कसा करावा

    . कलाकार/साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे. अशा पात्र लाभार्थी यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणेकरीता आवाहन करण्यात येते.